नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत करा

नाशिक : जिल्ह्यातील कांदा लिलाव तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
Undo onion auction in market committees in Nashik district
Undo onion auction in market committees in Nashik district

नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३ दिवसाच्यांवर लिलाव प्रक्रिया बंद ठेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. मात्र बाजार समिती शेतकरी वर्गाला विचारात न घेता मनमानी निर्णय घेऊ शेकते? त्यामुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

 जिल्ह्यात लासलगाव बाजार समिती गेल्या सप्ताहापासून बंद आहे. तर नामपूर बाजार समितीने बाहेर गावाहून वाहने व शेतकरी नामपूर गावात येत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. असे सांगून २६ व २७ एप्रिल रोजी बाजार समितीत कांदा व डाळिंब लिलाव बंद राहतील, अशी सूचना दिली आहे. शनिवार (ता.२४) पासून पुढील सलग ४ दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा घाट घातला गेला आहे. 

शेतकरी सध्या कांदा काढणी व इतर बाबींचा विचार करता मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीनंतर मजुरी, चाळ बांधणी, वाहन भाडे, लवकरच खरीप पिकांचे पुढील व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची गरज आहे. मागील संपूर्ण महिन्याचा विचार करता बाजार समितीत २४ दिवसांपैकी फक्त १० ते १२ दिवस कामकाज चालले आहे. या सुट्यांनंतर बाजार समिती चालू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. परिणामी बाजार भाव पडतात, असे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र तो कांदा लिलावामुळे कोरोना वाढत आहे अशी सबब देणे पूर्ण पणे चुकीचे आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आजपासून (ता.२६) ताबडतोब कांदा लिलाव पूर्ववत करा, अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे म्हटले आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी अधिकार वापरावे

जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्या मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, अशी सबब देऊन काही घटकांच्या अर्जावर मार्केट २ ते ३ दिवस, तर काही ठिकाणी ५ दिवस बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवले जातात. शेतकरी वर्गावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी बाजार समित्यांनी घ्यावी, असे निर्देश अधिकार वापरून करावा, या आशयाचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पगार यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com