वॉशिंग्टन : कोरोनाच्या विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनामुळे जगभरातील बळींच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे ५० हजारांहून अधिक बळी गेल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील जॉन हॉप्कीन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २.८ दशलक्ष एवढी झाली आहे. ११ जानेवारीला पहिला रुग्ण कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ११ जानेवारी रोजी चीनमध्ये पहिला बळी गेला होता. त्यानंतर आजपर्यंत या विषाणूचे रुग्ण २१० देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आले आहे. एकप्रकारे कोरोनाच्या संकटाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. टॉप पाईव्ह देश जगातील एकूण पाच देशांना कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पाच देशांमध्ये २० हजारांहून अधिक जणांचे बळी या विषाणूने घेतले आहेत.
फ्रान्समध्ये मृत्यूदरात घट
धोका वाढतोय
पश्चिम युरोपातील रुग्णांची संख्या स्थर आहे किंवा घटताना दिसते आहे. मात्र सुरवातीच्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या काही देशांमध्ये दुसरी लाट येण्यास सुरवात झाली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. - डॉ. टेड्रोस घेब्रियेसूस, डब्लूएचओचे प्रमुख दुसऱ्या लाटेची शक्यता
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.