पाथर्डी तालुक्‍यात खुरकुताने तीन जनावरांचा मृत्यू 

पाथर्डी तालुक्‍यात खुरकुताने तीन जनावरांचा मृत्यू
पाथर्डी तालुक्‍यात खुरकुताने तीन जनावरांचा मृत्यू

करंजी, जि. नगर : लाळ्या खुरकूत आजाराची लागण परिसरातील जनावरांना होऊ लागली आहे. पाथर्डी तालुक्‍यातील लोहसर येथील तीन जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला. हा आजार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच पावले उचलण्याची गरज पशुपालकांनी व्यक्त केली. 

करंजी परिसरातील बारा गावांमध्ये जनावरांची संख्या सुमारे साडेचार हजार आहे. यातील बहुतांश जनावरे छावणीत आहेत. या जनावरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लाळ्या खुरकूत आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. अनेक छावण्यांमध्येही तो आहे. लोहसर येथील भाऊसाहेब कारभारी दगडखैर यांची तीन जनावरे या आजाराने दगावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, आजार होऊ नये म्हणून शेतकरी स्वतःच जनावरांभोवती चुना मारत आहेत. 

या आजाराची साथ आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने लसीकरण होणे गरजेचे होते. लोहसर, भोसे, खांडगाव आदी अनेक ठिकाणी लसीकरणच झाले नसल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला. आजार झालेल्या जनावरांना तत्काळ औषधोपचार मिळणे गरजेचे असताना, सांगूनही संबंधित डॉक्‍टर फिरकले नाहीत. त्यामुळे तीन जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप दगडखैर यांनी केला आहे. 

आजारी जनावरांना परवानगी नाकारली  खुरकूत झालेल्या जनावरांना छावणीत स्वतंत्र शेडची व्यवस्था असते. मात्र, आजारी जनावरे छावणीत न घेण्याचाच सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी छावणीचालकांना दिल्याचे दगडखैर यांचे म्हणणे आहे. आपली तीन जनावरे दगावली व उरलेल्या नऊ जनावरांना छावणीने नाकारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दगडखैर यांनी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

शेतकऱ्यांची तक्रार आली आहे. त्याबाबत करंजी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरण आल्यानंतर अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल.  - जगदीश पालवे, तालुका पशुधन अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com