देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा फटका; उद्योजक, शेतकरी हवालदील

जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या वस्त्रोद्योगाला कोरोनामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याच वेळी आता लॉकडाऊनमुळे या उद्योगावर अवलंबून असलेले लाखो कामगार, शेतकरी हवालदील झाले आहेत.
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा फटका; उद्योजक, शेतकरी हवालदील
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा फटका; उद्योजक, शेतकरी हवालदील

जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या वस्त्रोद्योगाला कोरोनामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याच वेळी आता लॉकडाऊनमुळे या उद्योगावर अवलंबून असलेले लाखो कामगार, शेतकरी हवालदील झाले आहेत.

देशात यंदा जगात सर्वाधिक म्हणजेच ३६० लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनाची अपेक्षा आहे. तर किमान पाच हजार कोटी किलोग्रॅम सूत उत्पादनाचा अंदाज आहे. सुमारे ६० ते ६५ लाख गाठींच्या निर्यातीची अपेक्षा होती. कारखाने मंदीमुळे कमी क्षमतेने कार्यरत असतानाच कोरोनाच्या दहशतीमुळे प्रक्रिया थांबली. बाजारात फेब्रुवारीअखेरपर्यंत सुमारे २२० लाख गाठींची आवक झाली आहे. कोरोनामुळे गाठींची निर्यात मागील आठ दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. फक्त २६ लाख गाठींची निर्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत झाली. मागील हंगामात फेब्रुवारीअखेर सुमारे ३५ लाख गाठींची निर्यात देशातून बांगालेदश, चीन व आफ्रीकन देशांमध्ये झाली होती.

देशात उत्पादीत होणाऱ्या सुतातील २५ ते २८ टक्के निर्यात अपेक्षित होती. निर्यात होणाऱ्या सुतातील ४० ते ४५ टक्के सुताचा खरेदीदार एकटा चीन आहे. परंतु चीनमधील निर्यात फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच ठप्प आहे. तर आता व्हीएतनाम, बांगलादेशातील सूत निर्यात बंद झाली आहे. बांगलादेशात किमान २५ ते २९ लाख गाठींची निर्यात अपेक्षित होती. तेथेही सुमारे १२ ते १३ लाख गाठींची निर्यात झाली असून, तीदेखील मागील आठ दिवसांपासून ठप्प आहे.

गाठींची आयातही मागील दीड ते दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. वस्त्रोद्योगाला वर्षभरापासून चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा फटकाही बसला आहे. यामुळे मंदीचा सामना यंदाच्या हंगामात सुरवातीपासून करावा लागत होता. अनेक गिरण्या, जिनींग प्रेसिंग कारखाने निम्म्या किंवा ६० ते ७० टक्के क्षमतेने कार्यरत होते. आता कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हा फटका दोन लाख कोटींपेक्षा अधिक झाला आहे.

कापूस प्रक्रिया उद्योग अडचणीत आल्याने कापसाचा उठावही बंद झाला आहे. देशातील जिनींग प्रेसिंग कारखाने, सूतगिरण्या ठप्प झाल्या आहेत. लॉकडाऊन आणखी असणार आहे. यादरम्यानचा वित्तीय तोटा आणखी वाढेल. उत्पादनात देश मागे राहण्याची शक्‍यताही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारात खंडीचे (३५६ किलो रुई) दर १८ ते २० टक्‍क्‍यांनी कमी झाले. वस्त्रोद्योग अडचणीत येत असतानाच शासकीय कापूस खरेदीदेखील गाठींची उचल बंदावस्थेत असल्याने अडचणीत आली. कारण कापूस, सरकीचा साठा वाढला. गाठी कुठे ठेवायच्या? असा प्रश्‍न शासनासमोर निर्माण झाला. यामुळे खरेदी २९ फेब्रुवारीपासून अपवाद वगळता सर्वत्र बंद झाली. याचा परिणाम देशातील कापूस बाजारातही झाला आहे. दहा टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून कापसाची खेडा खरेदी किंवा शिवार खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना त्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. देशात ९० टक्के कापसाची खेडा खरेदी केली जाते. फेब्रुवारीपर्यंत देशभरातील कमाल कापसाची खरेदी शासन व कारखानदारांनी केलेली असली तरी अद्याप सुमारे आठ ते १० टक्के कापूस बाजारात आलेला नाही किंवा हा कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्याची विक्री न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता पुढे त्याची विक्री होईल की नाही? असा प्रश्‍नही आहे. कारण प्रक्रिया उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. लॉकडाऊन मागे घेतले तरी उद्योग सावरून किती गतीने सुरू होईल? ही भितीदेखील आहे.  लॉकडाऊनबाबत प्रश्‍न उपस्थित करता येणार नाही. परंतु व्यापार युद्ध, ठप्प झालेली निर्यात, चीनमधील संकट व आता लॉकडाऊन यामुळे जिनींग प्रेसिंग कारखानदार, सूतगिरण्या, कापड उद्योग हे सर्वच संकटात सापडले आहेत. शेतीनंतर सर्वात मोठा रोजगार या क्षेत्रात आहे. काही मदत करताना या क्षेत्राचा निश्‍चितच विचार सरकारकडून झाला पाहिजे.  - आर.डी.पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ (ता.शहादा, जि.नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com