सातारा जिल्ह्यात सव्वा कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

सातारा जिल्ह्यात सव्वा कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
सातारा जिल्ह्यात सव्वा कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

सातारा ः वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात एक कोटी २४ लाख रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर खड्डे घेतले जात आहेत. मात्र प्रमुख सूत्रधार असलेला वनविभागच खड्डे घेण्यात उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल २० लाखांने मागे पडला आहे. ३८ लाख २४ हजार रोप लावण्याचे उद्दिष्ट असताना सुमारे १८ लाख ९६ हजार खड्डे घेतले आहेत. 

राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात चार कोटी, दुसऱ्या टप्प्यात १३ कोटींची वृक्षलागवड केली. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात सातारा जिल्ह्यास एक कोटी २४ लाख ७५० वृक्षलागवडीचे लक्ष्य दिले आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या वेळी वृक्ष लागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. 

एक जुलै ते ता. ३० सप्टेंबर या काळात वृक्षलागवड कार्यक्रम होणार आहे. ही वृक्षलागवड जनचळवळ होण्याच्या अनुषंगाने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्याने हा वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांकडे या मोहिमेची धुरा सोपावली आहे. 

रोपे जगविणे, रोपांची ऑनलाइन मागणी नोंदविणे, यंत्रणेला रोपे पुरविणे, वृक्षलागवडीसाठी जागेची तरतूद करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल याबाबत सातत्याने आढावा ही घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५० प्रशासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात ग्रामपंचायत विभागाला ४७ लाख ८८ हजार ७०० उद्दिष्ट असून, आजवर ४२ लाख ६३ हजार २०३ खड्डे घेतले आहेत. कृषी विभागाला चार लाख ९६ हजार ८५० उद्दिष्ट असून, त्यांनी पाच लाख नऊ हजार ८८८ खड्डे घेतले आहेत. वन विभागाला ३८ लाख २४ हजार असून १८ लाख ९६ हजार खड्डे घेतले आहेत. वन विभाग तब्बल २० लाखांने मागे पडला आहे.

दहा हजारांवर ठिकाणे जिल्ह्यास एक कोटी २४ लाख ७५० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम सुरू असून, मे अखेरीस एक कोटी १३ लाख १५ हजार ४०३ खड्डे घेतले आहेत. उर्वरित खड्डे जून अखेरीस पूर्ण केले जाणार आहेत. ही वृक्ष लागवड जिल्ह्यातील दहा हजार ३१३ ठिकाणी केली जाणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com