मोहाचे पेय येणार बाजारात

madhuca indica
madhuca indica

नागपूर : मोहापासून पोषणमूल्यांनी भरपूर अशा ‘महुआ न्यूट्रीबेव्हरेज’ या पेयाची निर्मिती केली जाणार आहे. एप्रिलपासून हे पेय बाजार उपलब्ध होणार असल्याची माहिती असून आदिवासी भागास उत्पन्नाचे शाश्‍वत साधन मिळावे म्हणून केंद्र सरकारच यासाठीची गंतवणूक आणि निर्मिती करणार आहे.   मोहाचे झाड (Madhuca Indica) हे प्रामुख्याने दुर्गम भागात आढळते. आदिवासी भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था मोहाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाभोवती फिरते याबाबत दुमत जरी असले तरी ते खरे आहे. मोह फुलात नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि कॅल्शियम असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोह फुलांचे सुमारे ९० टक्के वार्षिक उत्पादन हे मद्य वर्गातील पेय बनवण्यासाठी वापरले जाते. या बाबी लक्षात घेऊन आदिवासींच्या विकासासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाने (ट्रायफेड) राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेसोबत (एनआरडीस) ‘महुआ न्यूट्रीबेव्हरेज’ या पेयासंदर्भात करार केला आहे.  ट्रायफेड आणि आयआयटी दिल्लीने या पेयाची निर्मिती केली आहे. या पेयाची निर्मिती करण्यासाठी आयआयटी दिल्लीने दोन वर्षे संशोधन केले आहे. सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याविषयी उद्योग उभारण्याचा सरकारचा विचार असून त्याद्वारे देशासह विदेशातही निर्यात केली जाणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारकडून याविषयी ५०० ते ६०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार असून अनुसूचित जाती समूहातील युवकांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदिवासी पाड्यांना लाभ विदर्भासह राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. बांबू, मोहाची झाडे यासह मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीने विदर्भातील वने, जंगले परिपूर्ण आहेत. येथील आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी ‘महुआ न्युट्रीबेव्हरेज'' निश्‍चितच उपयुक्त राहील असे जाणकारांनी सांगितले. सहा फळांच्या फ्लेवर्समध्ये ‘महुआ न्यूट्रीबेव्हरेज''ची ७५० मिलिलिटरच्या बाटलीमध्ये उपलब्ध होणार आहे. या पेयाची किंमत ७०० रुपयांपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे विविध सहा फळांचा स्वाद या पेयात असणार आहे. अशी आहेत वैशिष्ट्ये

  • पोषक तत्त्वांनी भरपूर
  • अल्कोहोलची मात्रा 
  • ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com