औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे आत्मक्लेष जागर आंदोलन

औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष जागर’ आंदोलन करण्यात आले.
Swabhimani's Atmaklesh Jagar Andolan in Aurangabad
Swabhimani's Atmaklesh Jagar Andolan in Aurangabad

औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.३) रात्री आठ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  रात्रभर आत्मक्लेष जागर’ आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत  आठ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून ‘स्वाभिमानी’ने रात्रभर जागरण गोंधळ घालून भजन केले. 

केंद्र सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, असा जागर यावेळी करण्यात आला. युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, पक्ष जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, चंद्रशेखर साळुंके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, तालुकाध्यक्ष संपत रोडगे, सुनील शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आझम खान, संतोष निकम, अब्दुल राऊफ, शिवाजी हुसे, अन्वर आली, भाऊसाहेब शेळके, शाहीर विजय काटे, दुर्गेश राठोड, समाधान सुराशे, अर्जुन पाटील, आरिफ पठाण, एकनाथ देशमुख यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com