अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला उभारीचा प्रयत्न 

आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणी वर्धनासाठी चार वर्षांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरोग्य सेवांसाठी ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये देणार आहेत.
budget
budget

पुणे ः आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणी वर्धनासाठी चार वर्षांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरोग्य सेवांसाठी ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये देणार आहेत. कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात १५० रुग्णालयांमध्ये सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. 

जिल्हा रुग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, ‘पोस्ट कोविड काउन्सिलिंग व ट्रीटमेंट सेंटर’  सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रुपये तरतूद.  अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी  रस्ते विकास 

  • नांदेड ते जालना महामार्गाच्या नवीन कामासाठी ७ हजार कोटी रुपये 
  • पुण्याबाहेरून रिंग रोडसाठी २६ हजार कोटी रुपये 
  • रायगड जिल्ह्यातील रेवस, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ५४० किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी ९ हजार ५७३ कोटी खर्च अपेक्षित 
  • ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची ४० हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. १० हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी. १ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद 
  • रेल्वे विकास 

  • पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद २३५ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी १६ हजार ३९ कोटी खर्च अपेक्षित. 
  • राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी व विद्युत बसेसमध्ये रूपांतर व बसस्थानकांचे आधुनिकीकरणासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. 
  • ग्रामविकास 

  • पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनांसाठी ६ हजार ८२९ कोटी ५२ लाख रुपये तरतूद 
  • मनुष्यबळ विकास 

  • शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरिता ३ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार 
  • प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’ स्थापन करण्याचा निर्णय. एकूण ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित 
  • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार. दोन लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी. 
  • सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘शिवराज्य सुंदर ग्राम अभियान’ राबविण्यात येणार. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार. 
  • मुंबईतील पर्यटन आकर्षणे 

  • हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये खर्चास मान्यता 
  • उद्योग, ऊर्जा व कामगार 

  • ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी २५ हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दिष्ट. 
  • एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिक कारागीर , मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी साहाय्य करून त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार 
  • नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार. 
  • कामगार 

  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी ‘समर्पित कल्याण निधी’, बीजभांडवल २५० कोटी रुपये 
  • जव्हार येथे गिरिस्थान पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार 
  • वरळी दुग्धशाळेच्या १४ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु. 
  • पुण्यातील साखर संकुलात सुमारे ४० कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित 
  • राज्यातील धूतपापेश्वर मंदिर ( ता.राजापूर,जि.रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर), एकवीरा माता मंदिर,कार्ले (ता.मावळ,जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता.सिन्नर, जि.नाशिक), खंडोबा मंदिर,सातारा (ता.जि.औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव, जि.बीड), आनंदेश्वर मंदिर,लासूर (ता.दर्यापूर, जि.अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (ता.चामोर्शी, जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी १०१ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित. 
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्त्वावर इयत्ता ६ वीपासून सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार. 
  • दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल, असे वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार. 
  • तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना. 
  • स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन १० रुपये आकारून तेवढाच निधी शासनाकडून देण्यात येणार. 
  • आदिवासी विकास 

  • १०० शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर 
  • रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे पथदर्शी तत्त्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत. 
  • इतर मागास बहुजन कल्याण 

  • महाज्योती,सारथी व बार्टी या संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपये
  • श्री. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १०० कोटी तरतूद 
  • शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास ५० कोटी तरतूद 
  • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास १०० कोटी तरतूद 
  • वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला १०० कोटी तरतूद 
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास २०० कोटी तरतूद 
  • औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्याकरिता ३ हजार ४८७ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com