शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांचा पुरवठा करा ः वर्षा गायकवाड

हिंगोली ः खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण, दर्जेदार खते, बियाणांचा पुरवठा करावा. कृषी निविष्ठांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
Supply quality seeds to farmers: Varsha Gaikwad
Supply quality seeds to farmers: Varsha Gaikwad

हिंगोली ः खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण, दर्जेदार खते, बियाणांचा पुरवठा करावा. कृषी निविष्ठांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते शेतकरी गटांमार्फत शेतकऱ्यांना बांधावर खत वितरणांचा प्रारंभ शनिवारी (ता. ९) करण्यात आला. यावेळी उमरा (ता. हिंगोली) येथील अमृतेश्वर शेतकरी गट, इडोळी (ता. हिंगोली) येथील विजय शेतकरी गट यांच्यामार्फत या गावांतील शेतकऱ्यांना एकूण २५ टन खते वितरित करण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन तसेच अन्य शेती कामांसाठी अडचणी येत आहेत. महावितरणने अखंडीत वीज पुरवठा सुरू राहावा यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्यांची कामे तत्काळ पूर्ण करावीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता वैयक्तिक स्वरूपाची कामे उपलब्ध करून देण्यात यावीत. पाणी टंचाई कृती आराखडा तयार करावा. मागणी येईल त्या गावास तत्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com