जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. २१) कोकणात बहुतांशी ठिकाणी, उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Strong winds, thunder, lightning and rain
Strong winds, thunder, lightning and rain

पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. २१) कोकणात बहुतांशी ठिकाणी, उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. तर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दोन तीन दिवसांपासून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला असतानाच रविवारी (ता. १९) सायंकाळनंतर चंद्रपूर, गोंदियासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. २०) सकाळपासूनच राज्यात ढगाळ हवामान होऊ लागले होते. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती.

उद्या (ता. २१) कोकणातील सर्वच जिल्हे, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (एल्लो अलर्ट) कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र : नंदूरबार  मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.  विदर्भ : गोंदिया, गडचिरोली

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा(एल्लो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com