तिथवलीत स्ट्रॉबेरी उत्पादन

सिंधुदुर्ग ः मल्चिंग, ठिबंक सिंचनाचा वापर करीत तिथवली येथील गुलझार निजाम काझी या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने सलग दुसऱ्यावर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Strawberry production in Tithwali
Strawberry production in Tithwali

सिंधुदुर्ग ः मल्चिंग, ठिबंक सिंचनाचा वापर करीत तिथवली येथील गुलझार निजाम काझी या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने सलग दुसऱ्यावर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याने यावर्षी लागवड केलेल्या १ हजार २०० रोपांमधून आता उत्पादन सुरू झाले आहे. 

कोकणातील लाल मातीतील स्ट्रॉबेरीची चव जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. एवढेच नव्हे तर उपलब्ध स्ट्रॉबेरीच्या झाडांपासून रोपनिर्मितीचे तंत्र देखील त्यांनी अवगत केले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोपे उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, आवळा अशी फळपिके घेतली जातात. खरिपात भात, नाचणी हीच प्रमुख पिके शेतकरी घेतात. परंतु, काझी यांनी गेल्यावर्षीपासून स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली. त्यांनी स्ट्रॉबेरीच्या चारशे रोपांची प्रयोग म्हणून लागवड केली होती. त्यातून त्यांना सात ते आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनाचा अंदाज त्यांना आला. त्यामुळे त्यांनी यावर्षी रोपांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. 

यावर्षी त्यांनी १ हजार २०० रोपे सातारा जिल्ह्यातील वाई येथून आणली. वाहतुकीस प्रतिरोप ९ रुपये दराने मिळाले. मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करीत त्यांनी या रोपांची १७ नोव्हेंबरला लागवड केली. आतापर्यंत दहा किलो उत्पादन मिळाले आहे. पुढील तीन ते चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम चालेल. त्यातून त्यांना सरासरी ५०० किलोपर्यंत उत्पादन मिळून सरासरी प्रतिकिलो २०० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आंबा, काजूचेही उत्पन्न  

काझी यांची आंबा, काजूची दोनशे ते अडीचशे झाडे आहेत. त्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. आंबा, काजू सोबतच हंगामी कलिंगड, भाजीपाला अशी पिके घेतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com