जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची आवक रोडावली

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात सोयाबीनची आवक रोडावली आहे. प्रतिदिन फक्त १२० क्विंटल आवक शेतकऱ्यांकडून झाली आहे. सध्या व्यापारी ते व्यापारी असे व्यवहार होत आहेत.
Soybean incoming short  in Jalgaon district
Soybean incoming short in Jalgaon district

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात सोयाबीनची आवक रोडावली आहे. प्रतिदिन फक्त १२० क्विंटल आवक शेतकऱ्यांकडून झाली आहे. सध्या व्यापारी ते व्यापारी असे व्यवहार होत आहेत. 

जिल्ह्यात सोयाबीन खाद्यतेल निर्मात्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना सोयाबीनची आवश्‍यकता आहे. हा पुरवठा शहरातील काही व्यापारी करतात. सध्या लातूर, जालना, औरंगाबाद आदी भागातून सोयाबीन येत आहे. तेथील व्यापारी हा सोयाबीन पाठवीत आहेत. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४६०० रुपयांपर्यंतचा दर आहे. तर, शेतकऱ्यांकडील आवक बाजारात कमी झाली आहे.

अतिपावसात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांकडील दर्जेदार किंवा प्रतवारी केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर काही खरेदीदारांकडे गुरुवारी (ता.१२) मिळाला. 

सोयाबीनचे उत्पादन जळगाव, धुळे  जिल्ह्यात फारसे घेतले जात नाही. जळगाव जिल्ह्यात फक्त २० ते २८ हजार हेक्टरवर पेरणी केली जाते. धुळ्यातही फक्त शिरपूर तालुक्यात तीन ते चार हजार हेक्टरवर पेरणी असते. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे २२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यातही सुरवातीला कमी पावसामुळे उगवण व्यवस्थित झाली नव्हती. अनेकांना पीक मोडावे लागले होते. यात क्षेत्र कमी झाले. अतिपावसात उत्पादन कमी आले. चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा आदी भागात एकरी दीड ते दोन क्विंटल उत्पादन हाती आले. यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारातील आवकही सुरवातीपासून रखडत सुरू आहे.

दरात समाधानकारक वाढ

सुरवातीला दर ३३०० ते ३६०५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु, या महिन्यात त्यात चांगली वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी विक्री टाळली होती. बाजारातच अडतदारांकडे सोयाबीन पडून होता. यातील दर्जेदार सोयाबीनला ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लातूर, जालना व इतर भागातील व्यापाऱ्यांकडून रोज १० ते १५ टन सोयाबीनचा पुरवठा शहरात होत आहे. हा पुरवठादेखील यंदा कमी आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com