मध्य प्रदेशात नव्या सोयाबीनला ६ हजारांवर दर

मध्य प्रदेशात सध्या नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली असून, आर्द्रता जास्त असल्याने प्रति क्विंटल ६ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे.
मध्य प्रदेशात नव्या सोयाबीनला ६ हजारांवर दर
मध्य प्रदेशात नव्या सोयाबीनला ६ हजारांवर दर

नागपूर : मध्य प्रदेशात सध्या नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली असून, आर्द्रता जास्त असल्याने प्रति क्विंटल ६ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातही सोयाबीनचे दर तेजीत राहण्याची शक्यता मध्य प्रदेशातील व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे.  देशातील आठ राज्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन होते. या मध्य प्रदेशात देशातील सर्वाधिक ५८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन होते. कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या सोयाबीन वाणाची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. या वर्षी मध्य प्रदेशला सोयाबीन बियाणे तुटवड्याचा मोठा सामना करावा लागला. त्यामुळे देशातील सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये या वर्षी लागवड क्षेत्र १५ ते १८ टक्‍क्‍यांनी घटल्याची माहिती आहे.  नव्या हंगामातील सोयाबीनची आवक बाजारात होण्यास सुरुवात झाली आहे. आष्टा बाजार समितीमधील व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज दोन ट्रॉली सोयाबीनची आवक बाजारात होत आहे. सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण १५ ते १६ टक्के असल्यास प्रक्रिया उद्योजकांकडून त्याला मागणी राहते. बाजारात नव्याने आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये आर्द्रता १८ ते १९ टक्के आहे. मात्र राज्यातील सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढती असल्याने सद्य:स्थितीत नव्याने आवक होत असलेल्या आणि अधिक आर्द्रता असलेल्या सोयाबीनला देखील चांगला दर मिळत आहे.  आष्टा बाजार समितीत आवक झालेल्या सोयाबीनला ६२०० रुपयांचा दर मिळाला. खंडवा बाजार समिती बुधवारी (ता.८) सोयाबीनचे व्यवहार सरासरी ६०११ रुपयांनी झाले. ऑक्टोबरपासून सोयाबीनची आवक वाढती राहील, मात्र दर ५७०० ते ६००० रुपये यादरम्यान राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कुठेही शिल्लक साठा नसल्याने यंदा सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा जास्तच राहतील असे संकेत व्यापारी सूत्रांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात क्षेत्र वाढले... मध्य प्रदेशमध्ये या वर्षी लागवड क्षेत्र कमी झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे बियाण्याची कोणतीही कमतरता जाणवली नाही. त्यामुळेच सरासरीच्या ४० लाख हेक्‍टर वरून लागवड क्षेत्र ४५ लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती देण्यात आली. देशातील आठ राज्यांमध्ये सोयाबीन सरासरी क्षेत्र (हेक्टर)

  • मध्य प्रदेश : ५८ लाख
  • महाराष्ट्र : ४० लाख
  • राजस्थान : ११ लाख 
  • आंध्र प्रदेश : १ लाख 
  • छत्तीसगड : ७६ हजार
  • गुजरात : १ लाख ४९२ 
  • कर्नाटक : ३ लाख ३२०
  • इतर राज्ये : १ लाख २५७ 
  • एकूण देशात : ११८.३८५ लाख 
  • प्रतिक्रिया... मध्य प्रदेशमध्ये ७० प्रक्रिया उद्योग आहेत. काही प्रकल्पांची क्षमता ५०० तर काहींची क्षमता एक हजार मेट्रिक टन आहे. या वर्षी नव्याने आठ नवे प्लांट सुरू झाले आहेत. त्यामुळे निश्‍चितच सोयाबीनला मागणी वाढणार आहे. हंगामाच्या सुरुवातीला पैशाची गरज असेल, तितके सोयाबीन विकतील आणि बाकीचे राखून ठेवतील अशी शक्यता देखील जास्त आहे. त्यामुळे देखील दर स्थिर राहणार आहेत.  - तरुण वेदमुथा (जैन), व्यापारी, आष्टा बाजार समिती, मध्य प्रदेश  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com