अकोल्यातील ६० गावांची टंचाई दूर होणार

जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील ६० गावांची पाणीटंचाईमधून कायम मुक्तता होण्यासाठी खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे,
Shortage of 60 villages in Akola will be eliminated
Shortage of 60 villages in Akola will be eliminated

अकोला ः जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील ६० गावांची पाणीटंचाईमधून कायम मुक्तता होण्यासाठी खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.  खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असून, ग्रामस्थांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी केंद्र शासनाचा ५० टक्के, तर राज्य शासनाचा ५० टक्के निधी वाटा असतो. खारपाण पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमात या योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी केंद्र शासनाकडे मागणी केली होती. खांबोरा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ६० गावांना काटेपूर्णा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या ग्रामीण पुरवठा योजनेअंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील ४२ गावे, तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील १८ गावांचा समावेश आहे. पाणीटंचाईच्या काळात योजनेच्या शेवटच्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच ही योजना जुनी झाल्याने पाणी वितरण व्यवस्था मोडकळीस आली आहे, हे लक्षात घेऊन योजनेच्या नूतनीकरणाची मागणी करण्यात आली होती.  या योजनेअंतर्गत दोन्ही मतदारसंघांतील गावांचा समावेश असल्याने आमदार सावरकर तसेच आमदार नितीन देशमुख यांनी संयुक्तपणे मंजुरीसाठी प्रयत्न केले. 

दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा  पुनरुज्जीवन पाणीपुरवठा योजनेस जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाने आर्थिक निकष बाजूला ठेवून सुमारे ६७.०३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरात प्रदान केली आहे. या योजनेअंतर्गत दर दिवशी दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com