पुण्यात माथाडी `बंद`ला अल्प प्रतिसाद

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. १४) पुकारण्यात आलेल्या संपाचा कोणताही परिणाम पुणे बाजार समिती मधील व्यवहारांवर झाला नाही.
पुण्यात माथाडी `बंद`ला अल्प प्रतिसाद Short response to Mathadi `Bandh` in Pune
पुण्यात माथाडी `बंद`ला अल्प प्रतिसाद Short response to Mathadi `Bandh` in Pune

पुणे : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. १४) पुकारण्यात आलेल्या संपाचा कोणताही परिणाम पुणे बाजार समिती मधील व्यवहारांवर झाला नाही. बाजार आवारातील सर्व विभागातील व्यवहार सुरळीत असल्याचे कांदा बटाटा भाजीपाला विभागप्रमुख दत्ता कळमकर यांनी सांगितले.  राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी बंदची हाक दिली होती. पुणे बाजार समितीमधील संघटना बंदमध्ये सहभागी झाली होती. मात्र इतर संघटना बंद मध्ये सहभागी नसल्याने बाजार आवारातील सर्व व्यवहार सुरळीत होते. बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१४) भाजीपाल्याच्या सुमारे ५० ट्रकची आवक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवार नंतर सोमवारी आवक कमी असल्याने बंदचा कोणताही परिणाम न झाल्याचे चित्र बाजार आवारात होते. दरम्यान, कोरोना संकटात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माथाडी कामगारांचे हाल झाले. अनेकांचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. नवीन कायद्यांमुळे देखील कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. कामगारांसाठीच्या विविध १८ मागण्यांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com