परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७ टन खते उपलब्ध

परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७ टन खते उपलब्ध

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी सार्वजनिक आणि खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांचे विविध पिकांचे मिळून एकूण ३० हजार ७६७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यापैकी ४२७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. विविध ग्रेडची मिळून एकूण ४० हजार ९१७ टन खते उपलब्ध झाली असून ६ हजार ६० टन खतांची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे. गतवर्षी १ लाख ६६ हजार ३६५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा (२०१९-१०) २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विविध पिकांच्या मिळून एकूण १ लाख ३८ हजार ४८० क्विंटल एवढ्या बियाण्यांची गरज आहे. त्यासाठी ‘महाबीज’कडे ३० हजार ९४१, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे २ हजार, ‘कृभको’कडे ५००, खाजगी उत्पादक कंपन्याकडे ३६ हजार ३४१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांकडील घरचे अंदाजे ६८ हजार ६९८ क्विंटलदेखील उपलब्ध होऊ शकेल. आजवर ‘महाबीज’कडून २० हजार २०५, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून १३५०, खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याचे ९२१२ क्विंटल असे मिळून एकूण ३० हजार ७६७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे ७५५, गव्हाचे ८ हजार ६७५, हरभऱ्याचे १६ हजार ६५, करडईचे १७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यापैकी विविध पिकांचे मिळून एकूण ४ हजार २७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी ५५ हजार ३० टन खतसाठा मंजूर झाला. खरिपातील २५ हजार २७ टन खते शिल्लक होती. त्यामुळे रब्बीसाठी एकूण ४० हजार ९१७ टन खतसाठा उपलब्ध होता. त्यामध्ये ६ हजार ८६९ टन युरिया, ५ हजार ३३२ टन पोटॅश, १ हजार ८३ टन सुपर स्फाॅस्फेट, ९ हजार ३३२ टन डीएपी, १८ हजार ७७ टन संयुक्त खते (एनपीके), २१४ टन अमोनियम सल्फेट या खतांचा समावेश आहे. यापैकी ६ हजार ६० टन खतांची विक्री झाली असून ३४ हजार ८५७ टन खते शिल्लक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com