ढोबळी मिरचीने आणले डोळ्यांत पाणी

गेल्या चार दिवसांपूर्वी ढोबळी मिरचीची जागेवर ६ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. मार्केटमध्ये नेऊन सौद्यास लावली तर १० ते १२ रुपये दर मिळतोय. पण वाहतूक धरली तर काहीच परवडत नाही. - प्रमोद गावडे, देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली
ढोबळी मिरची
ढोबळी मिरची

सांगली ः पाण्याची टंचाई, त्यातच शेतीपंपाची होणारी खंडित वीज, त्यावर मात करून ढोबळी मिरचीची लागवड केलीय, पण ढोबळी मिरचीचे दर कमी झालेत. मुंबईच्या मार्केटमध्ये मिरचीला एका किलोस गेल्या तीन वर्षांतील नीचांकी ६ ते ७ रुपये दर आहेत. दर परवडत नसल्याने मिरचीचा तोडा थांबवलाय, घातलेला खर्चही निघेना झालाय. मिरचीला दर नसल्याने हतबल झालेले कवठेपिरान (ता. मिरज) येथील शेतकरी हतबल होऊन आपली व्यथा सांगत होते.  सांगली जिल्ह्यातील मिरज पश्‍चिम भागातील कठवेपिरान, समडोळी, दूधगाव या गावांसह अन्य भागातही मोठ्या प्रमाणात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. या परिसरातून सुमारे ७० ते ८० टन ढोबळी मिरची मुंबई आणि पुढे मार्केटमध्ये जाते. मिरचीला दर चांगला मिळत असल्याने जिल्ह्यातील ढोबळी मिरचीच्या क्षेत्रातही वाढ झाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून पाणीटंचाई आणि मिरचीला मिळणारा दर यामुळे क्षेत्रात कमालीची घट झाली असल्याचे चित्र आहे.  ‘‘एक एकर ढोबळी मिरची लागवडीपासून ते पहिला तोडा होईपर्यंतचा सुमारे दीड ते दोन लाख खर्च येतोय. त्यानंतरची मजुरी, कीटकनाशक, एक दिवसाला एक लाख खर्च येतो. यामुळे एक पीक घेण्यासाठी सुमारे पाच ते सहा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. यंदा गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याने दर कमी झालेत, त्यामुळे घातलेला खर्चही मिळणे मुश्‍कील झाले आहे,’’ असे सुहास कुलकर्णी सांगत होते. जयंत शिरतोडे देवराष्ट्रे (ता. कडेगाव) म्हणाले की, मार्केटमध्ये ढोबळी मिरचीची आवक मोठ्या प्रमामात होते आहे, यामुळे दर कमी आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. मात्र, मार्केटमध्ये गेल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी पहायला मिळते आहे. मुळातच व्यापाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मिरचीचे दर कमी झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.  प्रतिक्रिया मी गेली आठ वर्षांपासून ढोबळी मिरचीचे पीक घेतोय. गेल्या तीन वर्षांपासून ढोबळी मिरचीचे दर खालीच येत आहेत. आजमितीस ढोबळी मिरचीस ६ ते ७ रुपये प्रतिकिलो असा दर मिळतोय, यातून घातलेला खर्च मिळणे मुश्‍कील झाले आहे. - सुहास कुलकर्णी, कवठेपिरान, ता. मिरज, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com