नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चौथ्या दिवशी पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चौथ्या दिवशी पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चौथ्या दिवशी पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३१ मंडळांत बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सकाळी आठ वाजेनंतर अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. सलग गेल्या चार- पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. 

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी लोहा, तसेच अन्य तालुक्यांतील एकूण ४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी  परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यांतील २० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यांतील ७ मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. पावसात अजिबात खंड पडत नसल्याने खरिपाच्या पिकांची नासाडी होत आहे.

मंडळनिहाय पाऊस (५ मिमीच्या पुढे) : 

नांदेड जिल्हा लोहा ५, माळाकोळी ९, कापशी ५,
परभणी जिल्हा सेलू १४, देऊळगाव ३८, केकरजवळा ८, बाभळगाव १५, हादगाव १७, सोनपेठ २३, बनवस ११, लिमला ७.
हिंगोली जिल्हा हिंगोली १०,माळहिवरा २५, डिग्रस ८, येळेगाव ६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com