राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असून मेघगर्नजेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. यातच उत्तर कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज (ता.११) कमी होऊन ते उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. तसेच रायलसीमा आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीदरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.  दरम्यान अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडेल. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात चढउतार होत आहे. त्यातच दिवसभर पडत असलेल्या उन्हामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे.

येथे पडणार जोरदार पाऊस  रविवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. सोमवारी ः ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ. मंगळवारी ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ. गुरूवारी ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना, अकोला, अमरावती, बुलडाणा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com