पुणे : गेल्या चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता त्याचा प्रभाव कमी होणार आहे. राज्यातील काही भागांत आज (ता.२४) अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत असलेली चक्रीय वाऱ्याची स्थिती सरकली. कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात या स्थितीचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. तसेच मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात चक्रीय स्थिती असून, समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर होती. त्यामुळे राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज (ता.२४) मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. इतर जिल्ह्यांतही काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान व कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. दिवसभर काही अंशी कोरडे हवामान असले, तरी दुपारनंतर होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार होत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत नऊ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भात चाळिशी पार झालेला पारा पुन्हा झपाट्याने खाली आला आहे. मंगळवारी (ता.२३) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर येथे ३८.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.