मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरी

मराठवाड्यात पाऊस बरसला
मराठवाड्यात पाऊस बरसला

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील ३१ तालुक्‍यात शनिवारी (ता.२२) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तुलनेने बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासह जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ तीन मंडळात पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये पाचोड मंडळात २४ मिलीमिटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी तालुक्‍यात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील परतूर मंडळात ४९ मिलीमिटर, आष्टी ४७, श्रीाष्टी २८, वाटूर, १९, अंबड ५८, जामखेड १५, सुखापूरी २१, कुंभार पिंपळगाव ३८, अंतरवली टेंबी मंडळात १५ मिलीमिटर इतक्‍या दखलपात्र पावसाची नोंद करण्यात आली. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव, केज, धारूर व परळी तालुक्‍यात पाउस बरसला. धारूर तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता.

बीड जिल्ह्यातील बीड मंडळात ४० मिलीमिटर, पेंडगाव १९, मांजरसुभा २७, पिंपळनेर २०, पाली २२, म्हळसजवळा १०, पाचेगाव १७, जातेगाव २०, सिरसदेवी १२, कौडगाव बु. १२, अंबाजोगाई ११, लोखंडी सावरगाव ११, माजलगाव ४०, गंगामसला १७, दिंद्रुड ६२, नित्रूड १२, तालखेडा १५ स, कि. अडगाव २२, केज २२, विडा ११, युसुफवडगाव १४, होळ १९, धारूर ४९, मोहखेड १४ आणि परळीत १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्‍यात पाऊस झाला. निलंगा, देवणी आदी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील मुरूड मंडळात २२ मिलीमिटर, तांदूळजा १९, औसा २०, लामजना १६, किल्लारी १२, किनीथोट १३, रेणापूर ११, मोघा १२, निलंगा ३३, कासारशिरसा २१, औराद श. २६, कासारबालकुंदा २०, पानचिंचोली १५, देवणी बु. १८, वलांडी ३२, बारोळ १७, शिरूर अनंतपाळ येथे ११ मिलीमिटर पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर ,उस्मानाबाद , कळंब, परांडा आदी तालुक्‍यात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर मंडळात २४ मिलीमिटर, उस्मानाबाद ग्रामीण मंडळात ३४, तेर १५, बेंबाळी १३, पाडोळी १०, गागजी २३, तुळजापूर २५, केशेगाव १९, सावरगाव २१, नळदूर्ग ११, मंगरूळ २०, सालगरा १६, इटकळ १७, उमरगा १७, मुरम ४५, नारंगावाडी ३२, डाळींब ३१, जेवळी ११, कळंब १८, इटकूर २३, शरढोण ३४, येरमाळा २०, मोहा १५, गोविंदपूर ११, माणकेश्‍वर ४५, तेरखेडा २०, अनाळा येथे ४३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com