पुणे : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा २४ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, निफाड येथे तापमानात घट होत पारा नीचांकी ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१ (२१.५), नगर ३१.५ (२२.५), कोल्हापूर ३०.१ (२१.२), महाबळेश्वर २४.६ (१७.५), मालेगाव ३०.२ (२२.८), नाशिक २९.८ (२०.४), निफाड २७.५ (११), सांगली ३१.२ (२०.७), सातारा २८.५ (२१.५), सोलापूर ३२.४ (२०.२), सांताक्रूझ ३४.२(२३.६), अलिबाग ३२.६ (-), डहाणू ३१.६ (२४.७), रत्नागिरी ३३.३ (२४.५), औरंगाबाद ३१.४ (२२.६), नांदेड २९.६ (२२.०), उस्मानाबाद - (१९.७), परभणी ३२.५ (२१.५), अकोला ३३.६ (२३.४), अमरावती ३२.८ (२०.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२१.२), बुलडाणा ३३ (२१.८), चंद्रपूर ३२.६ (२१.६), गडचिरोली ३२.४ (२१), गोंदिया ३१ (२१.२), नागपूर ३२.१ (२१.४), वर्धा ३२.६ (२१.६), यवतमाळ ३१.५ (२०.७).
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र होणार तीव्र अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, आज (ता. २०) त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या ठळक कमी दाब क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातील ही तीव्र प्रणाली (डिप्रेशन) जमिनीवर आले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वेल्लोरच्या पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर किनारपट्टीय तमिळनाडूमध्ये होती. या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.