सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५ नमुने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील साथरोग नियंत्रण कक्षाच्या वतीने जानेवारीमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी ४२ नमुने दूषित असल्याचे या पाहणीतून समोर आले.
जिल्हा परिषदेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील ६१५ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील ६४, दक्षिण सोलापुरातील ५४, मोहोळमधील ११३, मंगळवेढ्यातील १८, सांगोल्यातील २२, माढ्यातील ३२, अक्कलकोटमधील ७८, बार्शीतील ३६, करमाळ्यातील सहा, माळशिरसमधील १०४ आणि पंढरपुरातील ८८ असे एकूण ६१५ पाणी नमुने तपासण्यात आले. या नमुन्यांपैकी ४२ नमुने दूषित आढळले. पुढील कार्यवाहीसाठी याबाबतचा अहवाल देण्यात आला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच, दक्षिण सोलापुरातील तीन, मोहोळमधील चार, मंगळवेढ्यातील दोन, सांगोल्यातील एक, माढ्यातील तीन, अक्कलकोटमधील दोन, बार्शीतील तीन, माळशिरसमधील सात, पंढरपुरातील १२ पाणी नमुने दूषित आहेत. करमाळ्यातील एकही नमुना दूषित नसल्याचे; तर पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक १२ नमुने दूषित असल्याचे या पाहणीतून समोर आले.
वर्षभरात दोन वेळा तपासणी
पावसाळ्यात जलस्त्रोतांना नवीन पाणी येते. या कालावधीतील पाणी नमुने आणि उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने या कालावधीतील पाणी नमुने तपासले जातात. वर्षभरातून दोन वेळा ही तपासणी होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.