जळगावात पणन महासंघाकडून सात हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी 

जळगाव ः जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू आहे. एकूण सुमारे सात हजार क्विंटल कापूस विविध केंद्रांमध्ये खरेदी करण्यात आला आहे.
Purchase of more than seven thousand quintals of cotton from Marketing Federation in Jalgaon
Purchase of more than seven thousand quintals of cotton from Marketing Federation in Jalgaon

जळगाव ः जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू आहे. एकूण सुमारे सात हजार क्विंटल कापूस विविध केंद्रांमध्ये खरेदी करण्यात आला आहे. 

कासोदा (ता. एरंडोल), धरणगाव, दळवेल (ता. पारोळा), पारोळा आदी पाच ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे. दर्जानुसार कापसाला ५३५० व ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. एका केंद्रात रोज फक्त २० वाहनांमधील कापसाची खरेदी व पुढील प्रक्रिया केंद्रात केली जात आहे. मागील तीन दिवसांत रोज दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसंबंधी नोंदणी केली आहे, त्यांच्याच कापसाची खरेदी केली जात आहे. कापूस विक्रीस आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना टोकन दिले जात आहेत. यामुळे केंद्रात गर्दी कमी होत असून, कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर राखणेही शक्‍य होत आहे. 

अमळनेरचे केंद्र कोरोनामुळे बंद  अमळनेर (जि. जळगाव) येथे कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने तेथे खरेदी केंद्र पणन महासंघाने सुरू केलेले नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी पारोळा येथील केंद्रात कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु अमळनेरचे केंद्रही सुरू करावे. सुरक्षित अंतर राखले जाईल. शेतकरी सावधगिरी बाळगत आहेत. अधिकारी, प्रशासन व केंद्रधारक कारखानदार यांनी सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतील, त्या भागातील खरेदी बंद होवू शकते. तूर्त खरेदी सुरू आहे, अशी माहिती महासंघाच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com