पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणार
पुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड महिन्यांपासून बंद असलेला पुणे बाजार समितीमधील फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग रविवार (ता. ३१) पासून सुरू होणार आहेत. विविध धोरणात्मक निर्णयासह बाजारात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एक आडत्या एक वाहन आणि दिवसाआड विविध विभाग सुरू असणार आहे.
बाजार आवरातील गर्दी नियंत्रणबरोबरच शारीरिक अंतर राखण्यासाठी ‘एक अडत्या, एक वाहन’ या धोरणाप्रमाणे रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनास बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बाजार आवारातील गाळ्याच्या बर्हिगोल पाकळीची बाहेरच्या बाजूचे गाळेधारक अडते रविवारी (ता. ३१) तर आतील बाजूचे अडते सोमवार (ता. १) पासून पुढील प्रत्येक दिवशी दिवसाआड पद्धतीने व्यापार करतील.
शेतीमाल गाळ्यावर खाली झाल्यानंतर रिकामे वाहन बाजार आवाराच्या बाहेर काढण्यात येणार आहे. शेतीमाल घेऊन जाणारी वाहने दुपारी १२ वाजल्यानंतर बाजार आवाराच्या बाहेर काढण्यात येणार आहेत. सर्व अडते , शेतकरी व इतर बाजार घटकांनी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने शेतीमालाची विक्री केली जाणार आहे.
असे आहे नियोजन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.