पुणे जिल्ह्यात आत्तापासून चाराटंचाई

माझ्याकडे चार ते पाच जनावरे आहेत. त्यासाठी एक ते दीड एकर चारा पिके असते. सध्या एक एकर चारा पिकांची पेरणी केली आहे. यात अर्धा ज्वारी, मका अर्धा एकर आहे. चारा कमी पडत असल्यामुळे विकत उसाचे वाडे घेऊन चाऱ्याची व्यवस्था करत आहे. - प्रकाश करे, कळाशी, ता. इंदापूर, मी दुग्धव्यवसाय करत असल्यामुळे एकूण वीस जनावरे आहेत. त्यासाठी एक एकर मका, हत्ती घास अर्धा एकर आहे. तसेच थोडा वाळलेला चारा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात पाणी राहिल्यास चारा पिकांची पेरणी करणार आहे. - बजाबा मालपोटे, फळणे, ता. मावळ
पुणे जिल्ह्यात आत्तापासून चाराटंचाई
पुणे जिल्ह्यात आत्तापासून चाराटंचाई

पुणे : जनावरांच्या संख्येमुळे पुरेसा चारा उपलब्ध असणे गरजेचे आहे. खरीप हंगामात चारा लागवडीची स्थिती पाहता उत्पादनात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगामातही चारा पिकांचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील काही भागांत आत्तापासूनच चाराटंचाईस सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना आत्तापासून चारा व्यवस्थापनाची सोय करावी लागणार आहे. 

पूर्वेकडील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतील अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहे. त्यामुळे पशुधनाची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात सोय म्हणून बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामात चारा पिके घेतात. भोर, मावळ, वेल्हे तालुक्यांत बोटावर मोजण्याएवढीच चारा पिकांची लागवड झाली आहे.

पीकनिहाय झालेली चारा पिकांची लागवड (हेक्टरमध्ये) 

पीक झालेली लागवड 
मका  ५६७०
ज्वारी कडवळ ४९१०
बाजरी  ५०
लुसर्नग्रास १५२०
नेपिअर  ५६०
इतर चारा पिके १२,६१०
एकूण २५,३२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com