कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५० कोटींचे नुकसान

सोशल माध्यमात कोरोना विषाणूविषयी अफवा पसविणाऱ्यांवर सायबर क्राइमकडे तक्रार केली आहे. त्याचा तपास चालू आहे. अजूनही अशी अफवा पसरवली तर त्यांची तक्रार केली जाईल. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. — सच्चिंद्रप्रतापसिंग, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे
poultry
poultry

पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. मात्र, चार फेब्रुवारीनंतर सोशल मीडियावर या विषाणूचा कुक्कुटपालनावर परिणाम होतो, अशी अफवा पसरवली गेली. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती वेंकिजचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी दिली.   पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने ‘कोरोना विषाणू’ या विषयावर गुरुवारी (ता. २०) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग, एनआयव्हीचे शास्त्रज्ञ बी. व्ही. तांदळे, ससून हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे आदी उपस्थित होते. श्री. पेडगावकर म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषगांने कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय माहिती पसरविली गेली. यामुळे राज्यात चिकनचा तीन ते साडेतीन हजार कोटी टन असलेला खप कमी होऊन तो दोन हजार टनांवर आला. राज्यात जवळपास दररोज १० ते ११ कोटींचा फटका बसला आहे. त्यानंतर शासनाने कोरोनाचा कुक्कुटपालन मांसावर कुठलाही परिणाम होत नाही, अशी अधिसूचना काढून प्रसार होत नसल्याचा संभ्रम दूर केला. मात्र, हा व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. सध्या चिकनचा खप २४०० ते २५०० टन एवढा आहे.  श्री. सिंग म्हणाले की, कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमित होतो. तथापि, कुक्कुट पक्ष्यांमधील कोरोना विषाणू (इन्फेक्शस ब्रॉंकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये विषाणू संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून-शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. तरी ग्राहकांनी सोशल मीडिया-फेसबुक व व्हॉट्सअॅप इत्यादी माध्यमातील विपर्यास केलेली माहिती, बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नये. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com