बळिराजासाठी पोलिस आले धावून

शेतात पांढरे सोने, अर्थात कापूस उभा असताना वातावरणातही बदल होत आहे. त्यामुळे बळिराजाला चिंता सतावत आहे. शेतमजूर मिळत नाहीत. गरीब शेतकऱ्यांना त्यांचा खर्च परवडत नाही. अशा वेळी येथील पोलिस दलाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले.
The police came running for Baliraja
The police came running for Baliraja

सिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात कापूस उभा असताना वातावरणातही बदल होत आहे. त्यामुळे बळिराजाला चिंता सतावत आहे. शेतमजूर मिळत नाहीत. गरीब शेतकऱ्यांना त्यांचा खर्च परवडत नाही. अशा वेळी येथील पोलिस दलाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. शेतात अक्षरश: शेतमजुरासारखे राबत त्यांनी कापूस वेचणी केली. 

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात हातात बंदूक घेऊन दिवसरात्र घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असतात. मात्र हेच जवान चक्क शेतमजूर बनून शेतकऱ्याच्या मदतीला धावल्याने त्यांचे कौतुक होत आहेत. सिरोंचा तालुक्यातील नक्षलग्रस्त परिसरातील रेगुंठा येथील मधुकर लिंगय्या गाडपल्ली हा शेतकरी त्याची पत्नी व आई मिळून शेतातील कापूस वेचणी करीत होते. दरम्यान, या परिसरात गस्त घालत असलेले रेगुंठा उपपोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विजय सानप, पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक निजाम सय्यद यांच्या पथकाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला असता शेतकरी मधुकर गाडपल्ली यांनी कापूस वेचणीकरिता मजूर वेळेवर मिळत नाही. मजुरी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. शेतातील कापूस फुटून वाऱ्याने उडत आहे. 

खूप आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. शेतकऱ्याची अडचण लक्षात घेत प्रभारी अधिकारी विजय सानप यांनी स्वतः तसेच अभियानादरम्यान असताना पोलिस अंमलदार व राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक ११ नवी मुंबईचे पोलिस अंमलदार यांना एकत्र करीत शेतकरी गाडपल्ली यांची मदत करण्याचे ठरविले. पोलिस अधिकारी, जवानांनी चक्क गाडपल्ली यांच्या शेतात शेतमजूर बनून कापूस काढण्यासाठी त्यांना मदत केली. त्यांच्या दोन एकरातील जवळपास ३ ते ४ क्विंटल कापूस वेचणी करून दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com