मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी बोंड अळी

नांदेड: ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण एका वेचणीत संपले. तर, काही शेतकऱ्यांनी मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची लागवड केली होती. त्यांची दुसरी वेचणी सुरू आहे. या कपाशीवर सध्या ४० ते ६० टक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
Pink bond warm on 60 percent cotton in Marathwada
Pink bond warm on 60 percent cotton in Marathwada

नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण एका वेचणीत संपले. तर, काही शेतकऱ्यांनी मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची लागवड केली होती. त्यांची दुसरी वेचणी सुरू आहे. या कपाशीवर सध्या ४० ते ६० टक्के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

शेतकऱ्यांनी लवकर कपाशी पिकाची काढणी करावी. फरदड ठेवू नये’’, असे आवाहन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले.

औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यातील कपाशी पिकाची सध्या वेचणी सुरू आहे. त्याची पाहणी नांदेड कापूस संशोधन केंद्रातील कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. आनंद दौंडे व कृषी विद्यावेता अरविंद पंडागळे यांनी केली. यावेळी आढळून आलेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. 

हिरव्या बोंडावर गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लिंबोळी अर्काची (५ टक्के) फवारणी करावी. ट्रायकोकार्ड उपलब्ध असलेल्या परिसरात ४ ट्रायकोकार्ड प्रति एकर क्षेत्रावर सोडावे. ट्रायकोकार्ड उपलब्ध नसल्यास क्विनालफास २५ ईसी २० मिली प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डिसेंबरअखेर काढणी करावी आणि फरदड ठेवू नये. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com