नागरिकांनी ५० रुपयाने केली झेंडूची खरेदी

गतवर्षी प्रमाणे यंदाही झेंडू फुले अभियानास विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे शेतकऱ्यांकडून भाजीपाला तसेच इतर शेतमाल खरेदीसाठी ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगले दर मिळत आहेत. - अण्णा जगताप, प्रवर्तक, झेंडू फुले अभियान, हिंगोली.
झेंडू खरेदी
झेंडू खरेदी

परभणी ः दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांकडून किमान ५० रुपये दराने झेंडू फुलांची खरेदी करावी, यासाठी गतवर्षीच्या (२०१८) दिवाळी मध्ये सुरू करण्यात आलेल्या झेंडू फुले अभियानास यंदाही विविध स्तरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रविवारी (ता.२७) परभणी, हिंगोली येथे या अभियानास सुरवात झाली. जिंतूर, सेलू, वसमत या ठिकाणीही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला, असे या अभियानचे प्रवर्तक अण्णा जगताप यांनी सांगतिले. हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर झेंडू लागवड करत आहेत. बाजारपेठेतील आवक वाढल्यामुळे दरात घसरण येते. शेतकऱ्यांना रस्त्यावर फुले फेकून देण्याची वेळ येऊ नये. झेंडूस चांगले दर मिळावेत, शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा या उद्देशाने पुंगळा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील रहिवाशी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक अण्णा जगताप यांच्या पुढाकारातून गतवर्षी झेंडू फुले अभियान हा उपक्रम सुरू करण्यात आला. फटाके, रांगोळी आदीवरील खर्च कमी करुन प्रदूषणणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी झेंडूच्या फुलांनी घरांची सजावट करावी, रांगोळ्या काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडिया (व्हॉट्सअपवर) झेंडूंची फुले अभियान नावाने ग्रुप तयार करण्यात आले. फेसबुकवरून ५० रुपये किलो दराने खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. रविवारी (ता.२७) सकाळी परभणी येथे वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर झेंडू फुले विक्री अभियानचे उदघाटन करण्यात आले. या वेळी अच्युत महाराज दस्तापूरकर, साहित्यिक आसाराम लोमटे, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. किरण सोनटक्के, कवी केशव खटिंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रणजित कारेगांवकर, संतोष देशमुख, बबन आव्हाड, त्र्यंबक वडसकर, डॉ. रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते. या वेळी बाजारपेठेत फेरी मारून ५० रुपये किलो दराने झेंडूची फुले खरेदी करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले. हिंगोली येथील गांधी चौकामध्ये ज्येष्ठ चित्रकार भ. मा. परसावळे यांच्या हस्ते या अभियानचे उदघाटन करण्यात आले. या वेळी झेंडू फुले अभियानचे प्रवर्तक अण्णा जगताप, चंद्रकांत कावरखे, दादाराव शिंदे, पंडित आवचार, संजय मुसळे, विलास शिंदे आदींनी ५० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी करावे, असे आवाहन बाजारपेठत फेरी मारून केले. यंदा पावसात भिजल्यामुळे झेंडू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात २० ते ३० रुपये प्रतिकिलो पर्यंत दर कमी झाल्यामुळे झेंडू फुले अभियानअंतर्गत आवाहनास शिक्षक, डॅाक्टर आदीसह विविध स्तरातील नागरिकांनी प्रतिसाद देत ५० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी केली. परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत यासह अन्य ठिकाणी या अभियानास प्रतिसाद मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com