तेल्हारा बाजार समितीच्या सभापतिपदी पाथ्रीकर; उपसभापती अवताडे

तेल्हारा बाजार समितीच्या सभापतिपदी पाथ्रीकर; उपसभापती अवताडे
तेल्हारा बाजार समितीच्या सभापतिपदी पाथ्रीकर; उपसभापती अवताडे

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे पुरुषोत्तम पाथ्रीकर यांची सभापतिपदी; तर सहकार पॅनलचे अरविंद अवताडे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.  सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकरी व सहकार पॅनलने सत्ता स्थापन केली असून, प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांसाठी सभापती व उपसभापती पदे वाटून घेण्यात आली होती. सुरुवातीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आधीचे सभापती सुरेश तराळे व उपसभापती जनार्दन नागोलकार यांनी आपाल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नियमानुसार सभापती आणि उपसभापती पदासाठी शुक्रवारी (ता.२) निवडणूक घेण्यात आली.  शेतकरी पॅनलचे प्रा. सुधाकर येवले यांनी सभापतिपदाकरिता पुरुषोत्तम पाथ्रीकर यांचे नाव जाहीर केले; तर उपसभापतिपदाकरिता सहकार गटाचे श्‍याम ढाकरे यांनी अरविंद अवताडे यांचे नाव जाहीर केले. दोन्ही पदांकरिता दोघांचेच अर्ज असल्याने सभापती व उपसभापती यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राम सिद्धमही व सहायक निबंधक पोहरे यांनी कामकाज पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com