पुणे शहर, जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन

शहर आणि जिल्‍ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड परिसरात पुढील सात दिवसांसाठी अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे शहर, जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन Partial lockdown in Pune city, district
पुणे शहर, जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन Partial lockdown in Pune city, district

पुणे : शहर आणि जिल्‍ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड परिसरात पुढील सात दिवसांसाठी अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळे, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहेत. याची अंमलबजावणी शनिवारपासून (ता.३) पुढील सात दिवस असणार आहेत. तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. 

 राव म्हणाले, “कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कडक निर्बंध घालणे आवश्‍यक आहे. याचा कमीत कमी त्रास नागरिकांना झाला पाहिजे याची खबरदारी प्रशासन घेत आहे. निर्बंधाद्वारे कोरोना फैलावाची गती रोखण्यात यश मिळाल पाहिजे. असा प्रयत्न आहे. यासाठी सुवर्णमध्य काढण्यात येत आहे. यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच १८ वर्षांच्या वयावरील सर्वांना लस देण्याची गरज आहे. वाढती संख्या लक्षात घेता ५ एप्रिलपर्यंत सर्वाधिक बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेकडून ४०० आरोग्य सेवकांची भरती करण्यात आली आहे.’’  

शहर जिल्‍ह्यातील कोरोना फैलावाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट ३२ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८ हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे १०० टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील. तसेच पुढील दोन दिवसांत ७५ ते ८० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, असेही राव यांनी सांगितले.

पुण्यात काय सुरू, काय बंद?

  •   सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरू राहील.
  •   मॉल आणि चित्रपट गृहे सात दिवसांसाठी बंद
  •   धार्मिक स्थळे बंद सात दिवसांसाठी बंद
  •   पीएमपीएमएल बससेवा सात दिवस बंद. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
  •   आठवडे बाजारही बंद
  •   लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
  •   सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी
  •   दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
  •   शाळा महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com