कसमादे पट्ट्यावर कांदापुरवठ्याची मदार

कसमादे पट्ट्यावर कांदापुरवठ्याची मदार
कसमादे पट्ट्यावर कांदापुरवठ्याची मदार

नाशिक : संपूर्ण देशभरात कांद्याची मोठ्याप्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. त्यात देशभरात झालल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांदा लागवडी प्रभावित झाल्या आहेत. कांदा उत्पादकांनी साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी वाढली. सद्य:स्थितीत हा कांदा महाराष्ट्रातच आणि तोही विशेषत्वाने बागलाण, कळवण आणि देवळा तालुक्यांतच आहे. बाकी चंदवड, येवला, सिन्नरसह इतर तालुक्यांतील कांदा संपुष्टात आल्याने कांद्याची गरज येथूनच पूर्ण होत आहे. त्यामुळे कसमादे पट्ट्यावर कांदापुरवठ्याची मदार आहे.

 मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा करताना मोठा ताण पडला होता. देशभरात कांद्याची उपलब्धता कमी असल्याने दर वाढले होते. मात्र, वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदी केल्यांनातर व स्टॉक लिमिट केल्यानंतर बाजारात पुरवठा होताना अडचणी येत आहेत. दुष्काळ असल्याने सुरवातीला उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला आहे. त्यातच ढगाळ वातावरण कायम आहे. 

हवामानात आर्द्रता टिकून असल्याने सटाणा, कळवण आणि देवळा परिसरातही केवळ दहा ते पंधरा टक्के कांदा शिल्लक असून पुढील १५ दिवसांत हा कांदा संपणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकार नियोजन कसे करेल याकडे लक्ष लागून आहे. नवीन कांदा कुठेच नसताना महाराष्ट्रातील नाशिक, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात फक्त उन्हाळ कांदा शिल्लक आहे. त्यात प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा आणि मालेगावच्या काही भागांत उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. 

याच परिसरात उत्पादित केलेला कांदाच आणि याच भागात एवढा प्रदीर्घ काळ टिकणारा असल्याने चालू वर्षीही तो टिकला आहे. आजघडीला महाराष्ट्रातल्या चाळीत आठ-दहा लाख टन कांदा शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. देशातील एकंदरीत मागणीच्या तुलनेत पुढील १५ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदापुरवठा करण्याची जबाबदारी कसमादे पट्ट्यावर आहे हे नक्की आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com