कांदा बियाण्याचे दर कडाडले

कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याचेही दर कडाडले आहे. सध्या बियाण्याची २५०० ते ४५०० प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील, या आशेने शेतकऱ्यांकडून चढ्या दरानेही बियाणे खरेदी केली जात आहे. बियाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात कांदाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Onion seed prices skyrocketed
Onion seed prices skyrocketed

सातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याचेही दर कडाडले आहे. सध्या बियाण्याची २५०० ते ४५०० प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील, या आशेने शेतकऱ्यांकडून चढ्या दरानेही बियाणे खरेदी केली जात आहे. बियाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात कांदाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा हे प्रमुख पीक असून पश्चिम भागातही कांदा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा पिकांचे ११ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. लाॅकडाऊन बंद झाल्यावर कांद्याच्या दरात सुधारणा होत जाऊन क्विंटलला ८ हजार रुपयापर्यंत पोचले होते.

सध्या साठा मर्यादा घातल्याने कांद्याच्या दरात घट झाली आहे. मात्र, कांद्याचे दर कमी जास्त होत असलेतरी कांदा बियाण्याचे दर तेजीत आहे. कंपन्यांकडून येणारे बियाण्याचे दर ३५०० ते ४५०० तर २५०० ते ३००० प्रतिकिलो सुट्या पद्धतीने विक्री केली जात आहे. जिल्ह्याच्या बाहेरून बियाणे खरेदी केली जात आहे. कांद्याचे दर समाधानकारक राहतील या एकमेव आशेवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बियाण्याची मागणी होत आहे. या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बियाण्याचे दर वाढवले जात आहेत. बियाण्याचे दर वाढल्यामुळे कांद्याच्या रोपाचे दर वाढणार आहे. भांडवली खर्चात होणारी वाढ व बियाण्याचा तुटवडा यामुळे कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

फसवणुकीचे प्रकार बियाण्याची मागणी लक्षात घेऊन चढ्या बरोबर बोगस बियाण्याची विक्री केली जात आहे. चढ्या दराने बियाणे घेऊन अनेक ठिकाणी या बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी येत आहे. सुट्या पद्धतीने खरेदी केली जात असल्यामुळे पावत्या मिळत नसतात. यामुळे बियाणे उगवले नाही म्हणून तक्रारही करता येत नाही. त्यातूनही तक्रार केली पावसाचा परिणाम झाला असेल अशी उत्तरे दिली जात आहे. काही ठिकाणी बियाणे विक्री करणारे प्रसिद्ध शेतकऱ्यांची नावे सांगून बियाणे विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com