उत्तर प्रदेशातील घटनेसाठी बंद पाळला;  राज्यातील शेतकऱ्यांना मदत कधी? 

लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व केंद्र सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. पण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूर, पावसामुळे जुलै महिन्यापासूनच अडचणीत सापडले आहेत.
 उत्तर प्रदेशातील घटनेसाठी बंद पाळला;  राज्यातील शेतकऱ्यांना मदत कधी?  Observed off for the incident in Uttar Pradesh; When to help farmers in the state?
उत्तर प्रदेशातील घटनेसाठी बंद पाळला;  राज्यातील शेतकऱ्यांना मदत कधी?  Observed off for the incident in Uttar Pradesh; When to help farmers in the state?

अकोला : लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व केंद्र सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला. पण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूर, पावसामुळे जुलै महिन्यापासूनच अडचणीत सापडले आहेत. प्रत्येक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा ससेमिरा सुरूच आहे. आर्थिक मदतीची घोषणा सरकारकडून वेळोवेळी करण्यात आली. परंतु अजूनही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचली नाही. ही मदत केव्हा देणार, अशी विचारणा भारत कृषक समाजातर्फे करण्यात आली आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीचे पत्रही पाठवल्याचे महाराष्ट्र कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी सांगितले.  या बाबत म्हटले आहे, पीक नुकसानाचे पंचनामे अर्धवट झाले. विमा कंपनीच्या माध्यमातून अँडव्हान्स २५ टक्के रक्कम ताबडतोब देण्याचे आदेश झाले. परंतु अजूनही शेतकऱ्यांची या सणासुदीच्या दिवसांत आर्थिक मदतीची प्रतीक्षा सुरूच आहे. मागील वर्षीच्या सोयाबीन पीकविम्यासाठीही अजूनपर्यंत काही ठोस निर्णय नाही. कागदोपत्री बोगस पीक कापणी प्रयोगासंबंधी पण काही कारवाई नाही. शासनाने आता लवकरात लवकर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी थकीत असलेला पीकविमा, कर्जमाफीची रक्कम, अतिवृष्टीग्रस्तांची मदत लवकर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com