पोखरापूर येथे कुपोषण निर्मूलनासाठी पोषण परसबाग

पोखरापूर येथे कुपोषण निर्मूलनासाठी पोषण परसबाग
पोखरापूर येथे कुपोषण निर्मूलनासाठी पोषण परसबाग

सोलापूर : मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे पोखरापूर येथे ‘पोषण मूल्य आधारित शेती पद्धती’ प्रकल्पांतंर्गत पोषण परसबाग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या सहयोगाने एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, चेन्नई यांचे तांत्रिक मार्गदर्शनाखाली युनिसेफ या संस्थेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पोखरापूर येथे राबविण्यात येत आहे. महिला व बालकांमधील कुपोषण निर्मूलन करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. 

याप्रसंगी डॉ. वळकुंडे यांनी या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व विस्तार कार्यक्रमाबाबत माहिती दिली. विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी पोषण परसबागेसाठी लागणाऱ्या १४ प्रकारांच्या भाजीपाला बियाण्यांचे आणि फळझाडांचे वितरण केले.

क्षीरसागर म्हणाले, ‘‘कुपोषण निर्मूलनासाठी पोषण परसबाग प्रात्यक्षिके ही शेतकरी कुटुंब, अंगणवाडी व शाळा, भूमीहीन कुटुंबांसाठी सामुदायिक परसबाग प्रकल्पातंर्गत निर्माण करण्यात येतील.’’  धनश्री वाघमोडे यांच्या प्रक्षेत्रावर १ गुंठा वर्तुळाकार आराखडा पोषण परसबाग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. 

या वेळी राजेश जाधव, बाळासाहेब काळदाते, ज्ञानेश्वर नावडकर, मनीष खेडकर व हरिदास कारंडे उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल, अरुण गांगोडे, मोहोळ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नीलिमा गाडेकर, वर्षा शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com