उत्तरेतील हिमवृष्टीचा केळीला झटका

north india in banana export stop
north india in banana export stop

रावेर, जि. जळगाव ः उत्तर भारतात सध्या सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे काश्‍मीरकडे जाणारे रस्ते बंद झाले असून, याचा फटका खानदेशी केळीला बसला आहे. जिल्ह्यातून उत्तर भारतात वाहतूक होणाऱ्या केळीच्या मागणीत घट झाल्याने क्विंंटलमागे सुमारे शंभर रुपयांनी दरात घसरण झाली आहे. 

गेल्या १२ डिसेंबर रोजी येथील बाजार समितीने जाहीर केलेले केळीचे भाव १४०० रुपये क्विंटल व फरक १२ रुपये असे एकूण १४८४ रुपये इतके होते. मात्र टप्प्याटप्प्याने त्यात २० रुपये क्विंटलची घट होत जाऊन उद्यासाठी (ता. १९) हे भाव १३२० रुपये क्विंटल फरक १२ रुपये असे एकूण एक हजार ३९२ रुपये क्विंटल आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीतील लिलावात केळीचे भाव प्रथमच रावेरच्या केळी भावापेक्षा कमी असल्याचे चित्र या पंधरवड्यात पाहायला मिळाले. 

मंगळवारी (ता. १७) बऱ्हाणपूर येथील बाजारपेठेत केळीच्या ७० गाड्यांची आवक होती आणि तेथील सर्वोत्कृष्ट केळीला ८११ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. आज (ता. १८) बऱ्हाणपूर बाजारपेठेत केळीचे भाव ८०० रुपये क्विंटल इतके होते आणि बाजारपेठेत  ५० गाड्यांची आवक झाली होती. केळीची आवक कमी होऊनही आज तिथे केळीच्या भावात वाढ झाली नाही. 

बाजारभावातील या प्रकाराबाबत रावेर बाजार समितीच्या केळी बाजारभाव निश्‍चिती समितीचे प्रमुख रामदास पाटील (निंबोल) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की बऱ्हाणपूर पट्ट्यातील केळीच्या दर्जापेक्षा सध्या रावेर परिसरातील कापणी योग्य केळीचा दर्जा हा अधिक चांगला आहे. त्यामुळे येथील केळीला बऱ्हाणपूरपेक्षा शंभर ते दोनशे रुपये क्विंटलला जास्त भाव मिळत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com