राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : पाऊस ओसरल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. शनिवारी (ता. २८) दिवसभर ढगाळ हवामानासह उकाडा जाणवत होता. आज (ता. २९) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उद्या (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  मॉन्सून सक्रिय असल्याने दोन-तीन दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने दणका दिल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. तर उर्वरित राज्यात मात्र पावसाची मुख्यत: उघडीप होती. सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढल्यानंतर दुपारनंतर ढगाळ हवामान होत आहे.   दरम्यान, उत्तर अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता काहीशी वाढण्याचे संकेत आहेत. यामुळे गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात आज (ता. २९) हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उद्या (ता. ३०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : सुधागडपाली ३४. मध्य महाराष्ट्र : अंमळनेर २६, नंदुरबार २०.  विदर्भ : अकोला ३३, अकोट ३४, बाळापूर ३४, पातूर २६, तेल्हारा २२, अमरावती २४, अंजणगाव २५, बटकुली २३, चांदूरबाजार ६४, चिखलदरा ४४, दर्यापूर २६, धारणी २६, मोर्शी ६७, परतवाडा ३२, वरूड ७३, काटोल ३४, नरखेडा ६५, पारशिवणी ४०, सावनेर २१, आष्टी ४७, मानोरा ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com