पळसखेडा, जि. जळगाव : महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नारायणराव महानोर यांचे रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता हृदयविकाराने पळसखेड येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २५) सकाळी ९.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते कविवर्य ना. धों. महानोर यांचे लहान बंधू होत. गेल्या पन्नास वर्षांपासून नारायणराव महानोर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करीत होते. सीताफळ उत्पादक संघ राज्याचे उपाध्यक्ष होते. सीताफळ उत्पादनात त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.