नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२८ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, हिमायतनगर, नायगाव, मुखेड, कंधार तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर वगळत अन्य आठ तालुक्यांतील २८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. पूर्णा तालुक्यातील मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २४ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यातील मंडळांमध्येदेखील पावसाने हजेरी लावली.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) ः 

नांदेड जिल्हा नांदेड शहर ४३, नांदेड ग्रामीण ४०, तुप्पा ५३, विष्णुपुरी ३५, वसरणी ४२, वजीराबाद ४४, तरोडा ४९, लिंबगाव १२, मुदखेड १७, मुगट ४०, बारड २१, अर्धापूर १६, दाभड ४०, मालेगाव २६, हदगाव २९, तामसा ४६, पिंपरखेड १७, निवघा १६, तळणी ८, आष्टी ७, इस्लापूर ८, बोधडी ९, दहेली ५, जलधारा ४१, शिवणी ४०, वानोळा १४, वाई बाजार ३, हिमायतनगर ३८, सरसम ६३, जवळगाव ४५, भोकर ४२, किनी २६, मोगाली ३०, उमरी २६, सिंदी ४५, धर्माबाद ९, जारिकोट ४, नायगाव ४२, नरसी ५५, मांजरम ३६, बरबडा ३८, कुंटूर ४९, आदमपूर ५, लोहगाव २८, देगलूर २५, खानापूर २४, शहापूर ४, मरखेल १५, मालेगाव २८, हनेगाव ७, मुखेड ३०, जांब १५, येवती ५५, जाहूर ४८,चांदोला ३७, मुक्रमाबाद २३, कंधार ९, कुरुला १८, उस्माननगर १३, बारुळ ३९, पेठवडज १६, फुलवळ २०, लोहा १४, माळाकोळी २१, कलंबर १८, शेवडी १३, सोनखेड ११, कापसी ३९.
परभणी जिल्हा सेलू ५, हदगाव ९, सोनपेठ ९, आवलगाव ५, गंगाखेड ६, बनवस १०, पूर्णा ४४, ताडकळस ६, चुडावा २१, कात्नेश्वर ८.
हिंगोली जिल्हा हिंगोली ८, खंबाळा ९, माळहिवरा ९, सिरसम ७, नरसी नामदेव ६, डिग्रस ५, कळमनुरी २६,आखाडा बाळापूर ६३, डोंगरकडा ५१, वारंगा फाटा ३८, वाकोडी ३७, वसमत ११, हट्टा ५, गिरगाव २५, कुरुंदा ९, टेंभुर्णी ७, आंबा २४, हयातनगर ३८, गोरेगाव ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com