नगर ः जिल्ह्यात पाऊस नसल्याने मूग उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातील प्राथमिक माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुगाचे उत्पादन ५० टक्के घटले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मुगाचे प्रतिहेक्टरी ४२१ किलो ७३३ ग्रॅम उत्पादन होते. यंदा २२५ किलो ३४३ ग्रॅम उत्पादन मिळाले. कर्जत तालुक्यात प्रतिहेक्टरी केवळ ४४ किलो ६०० ग्रॅम उत्पादन मिळाले.
जिल्ह्यातील सर्वच भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. नगर, पारनेरसह जिल्ह्यांतील काही भागात मुगाची लागवड होते. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला नसला तरी अधूनमधून झालेल्या अल्प पावसावर मुगाची पेरणी झाली. त्यामुळे सरासरीच्या तिप्पट क्षेत्रावर पेरणी झालेली असली, तरी त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.
यंदा जिल्ह्यातील दहा तालुक्यांत १९८ पीक कापणी प्रयोग केले. त्यानंतर प्राथमिक स्तरावरील तालुकानिहाय उत्पादन निश्चित झाले. यंदा सर्वाधिक राहुरी तालुक्यात ४२२ किलो ५०० ग्रॅम तर नगर तालुक्यात हेक्टरी ३२२ किलो ७५९ ग्रॅम उत्पादन मिळाले. मुगाचे उत्पादन व कंसात गतवर्षीचे उत्पादन (प्रति हेक्टरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.