दूध क्रांतीमुळे थांबतील आत्महत्या ः नितीन गडकरी

दूध क्रांतीमुळे थांबतील आत्महत्या ः नितीन गडकरी
दूध क्रांतीमुळे थांबतील आत्महत्या ः नितीन गडकरी

नागपूर ः दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला. 

मदर डेअरीच्या ऑरेंज मावा बर्फीच्या उद्‌घाटनप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. या वेळी मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनवर मदर डेअरीच्या बूथचे रिमोटने उद्‌घाटन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालनमंत्री गिरिराजसिंग, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी, महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे, माफसू कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी शेतीत उत्पादन आणि पूरक उद्योग वाढावेत. दूध उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादन वाढले तर प्रक्रिया करून विकले गेले पाहिजे. यावर मदर डेअरी चांगले काम करीत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात ही त्यामागील भावना आहे. दुधावर आधारित उत्पादनांच्या विक्रीसाठी मदर डेअरीने जो विकेल त्यांना बूथ द्यावे. विदर्भात ८४ सेंटर असून, त्यातील ५५ नागपुरात आहेत. चांगल्या उत्पादनासाठी मार्केटिंगची गरज नाही. ऑरेंज बर्फी देशात प्रसिद्ध होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

दिलीप रथ म्हणाले, ‘‘मदर डेअरीतर्फे नागपुरातून १२०० मेट्रिक टन संत्री खरेदी केली जाईल. या वर्षी ७६० टन संत्रा खरेदी करून दिल्लीत नेणार आहे. नागपुरातील मदर डेअरीमध्ये दहा जिल्ह्यांतील ३ हजार शेतकऱ्यांकडून २ लाख लिटर संकलित करण्यात येत आहे. त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोचविण्यात येत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com