मंगळवेढा बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबवावी : देशमुख

Mangalwedha Market Committee should implement a commodity mortgage scheme : Deshmukh
Mangalwedha Market Committee should implement a commodity mortgage scheme : Deshmukh

मंगळवेढा, जि. सोलापूर : ‘‘बाजारात शेतमालाचा भाव स्थिर ठेवण्यासाठी मंगळवेढा बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डाळिंब सौदे केंद्राचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे होते. या वेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, सभापती प्रदीप खांडेकर, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, प्रकाश जुंदळे, दिलीप चव्हाण, मंजुळा कोळेकर, सचिन शिवशरण, सुधाकर मासाळ, अजीम शेख, राजेंद्र पाटील, विजय माने, पप्पू काकेकर, रामचंद्र कोंडूभैरी, अनिल बोदाडे, अनिता इंगळे उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ‘‘शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती मध्यस्थीचे काम करत आहे. शेतकऱ्याच्या कष्टाला व्यापाऱ्यांनी चांगला दर दिल्यास मालाची आवक वाढण्यास मदत होईल. त्यामुळे बाजार समितीचा नावलौकिक वाढणार आहे. चांगल्या दरासाठी बाजार समितीने सहकार्य केल्यास लोकमंगलच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगला दर देण्यासाठी जेवढा पैसा लागेल, तो कर्जरूपाने देण्यासाठी प्रयत्न करू.’’ 

समाधान आवताडे म्हणाले, ‘‘ज्वारीचे कोठार असलेल्या तालुक्‍यामध्ये अलीकडच्या काळात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्यांच्या डाळिंबाला बाहेरच्या बाजारपेठेत कमी दर मिळत होता. परंतु, आता बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची सोय झाली आहे. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वाचला आहे. त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी अधिकाधिक डाळिंब बाजारात आणावे.’’ भारत मुंढे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com