बदनापूर, जि. जालना : मोसंबी संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या मोसंबी झाडांचे छाटणी, कीड-रोग, खते, बहर आणि बोर्डो पेस्ट आदींचे व्यवस्थापन नीट नेटके असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बाबींचा अवलंब आपल्या बागेत करून उत्पादन वाढ साधावी, असे प्रतिपादन राज्याचे संचालक (फलोत्पादन) डॉ. कैलास मोते यांनी केले.
मोसंबी संशोधन केंद्रास शनिवारी (ता. ५) दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विभागीय कृषी अधीक्षक साहेबराव दिवेकर, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, कृषी उपसंचालक (फलोत्पादन) डी. एस. दिवेकर, कृषी अधिकारी के. एन. बक्षी, प्रा. अशोक कराड आदी उपस्थित होते.
या वेळी प्रक्षेत्रावर नव्याने लागवड करण्यात आलेल्या अलीमो, रंगपूर आदी खुंटाची आणि विक्रम, प्रमालिनी, चक्रधर, साई सरबत्ती, फुले सरबती, अकोला बहार आदी लिंबू वाणांची तसेच रोपवाटिकेत करण्यात आलेल्या कलमीकरणाची पाहणी करण्यात आली. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या हवामान आधारित फळपीक विमा बैठकीत चर्चा केलेल्या प्रत्यक्ष मोसंबी वाढीच्या टप्यांची चर्चा, पाहणी या वेळी शास्त्रज्ञांसोबत करण्यात आली.
या वेळी डॉ. मोते म्हणाले, की कृषी विभाग अंतर्गत रोपवाटिका धारकांसाठी प्रशिक्षण आणि प्रत्याक्षिकांचा कार्यक्रम या केंद्रावर राबविल्यास चांगल्या दर्जाची रोपे, कलमे तयार होण्यास मदत मिळेल. येथील विविध जातींची माहिती रोपवाटिका धारकांसाठी फायद्याची असणार आहे. या वेळी केंद्रातील संशोधन सहायक त्रिवेणी सांगळे, सुरेश गजर आदी कर्मचारी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.