नाशिक जिल्ह्यात यंदा मका पिकाला सर्वाधिक पसंती

नाशिक : जिल्ह्यात एकूण प्रस्तावित ६ लाख ६५ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने ९०.८५ टक्के (ता.२५) पूर्ण झाल्या आहेत. यात यंदा शेतकऱ्यांकडून मका पिकाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
 Maize crop is most preferred in Nashik district this year
Maize crop is most preferred in Nashik district this year

नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यानंतर पेरण्यांना गती अली. मात्र जून व जुलै महिन्यात पावसाने मोठे खंड दिले. त्यानंतर पेरण्यांची गती कमी झाली होती. त्यामुळे एकूण प्रस्तावित ६ लाख ६५ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने ९०.८५ टक्के (ता.२५) पूर्ण झाल्या आहेत. यात यंदा शेतकऱ्यांकडून मका पिकाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त पीक पेरणीच्या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वधिक पेरण्या मक्याच्या आहेत. तर, सर्वाधिक कमी क्षेत्र सूर्यफूल पिकाचे आहे. एकूण ६ लाख ६५ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख २६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्या झाल्या आहेत. एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १०८ टक्के त्या आहेत. यासह तेलबियांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील पश्चिम उत्तर भागात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यातील अनेक भागात भात हे प्रमुख पीक आहे. जुलैअखेर रोपांचा लागवड कालावधी पूर्ण होऊनही पाऊस नसल्याने लागवडी पूर्ण झाल्या नव्हत्या. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यांनंतर लागवडी वेगाने सुरू झाल्या. त्यामुळे एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या ४ टक्के अधिक लागवडी पूर्ण झाल्या आहेत.

मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्के घट झाली आहे. कडधान्य पिकांमध्ये मूग, तूर व उडीद यांचे क्षेत्र चालू वर्षीही कमी झाले आहे. ८४ हजार ६९० हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर अवघ्या ४१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र घटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com