खानदेशात कर्जमाफीचा लाभ सुरू, मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक वंचित

खानदेशात कर्जमाफीचा लाभ सुरू, मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक वंचित
खानदेशात कर्जमाफीचा लाभ सुरू, मात्र तांत्रिक कारणांमुळे अनेक वंचित

जळगाव : खानदेशात शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आधार प्रमाणीकरण केलेल्या सुमारे दोन लाख शेतकऱ्यांपैकी ८० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड झाली आहे. नव्याने कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण सुरू करावे, असा मुद्दाही उपस्थित केला जात असून, बॅंकांची त्याबाबत बैठक घेण्याची मागणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख ४३ हजार, धुळ्यात सुमारे एक लाख तर नंदुरबारातही एक लाखांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यात मिळून सुमारे ८० हजार तर नंदुरबारातही २० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम शासनाने जमा केली आहे. बॅंकांना त्याची रोजची माहिती ऑनलाइन मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेशही दिला जात असल्याची माहिती मिळाली. 

उपायांसाठी समिती आधार प्रमाणीकरणासंबंधी तांत्रिक अडचणी येत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात मात्र लाभाची रक्कम जमा झालेली नाही. हे तांत्रिक दोष शोधण्यासह त्यावर उपाय करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला या आठवड्यात अंतिम कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत खानदेशातील ९० टक्के कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचे संकेत मिळत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख २५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहेत. तर धुळे व नंदुरबारात ९० टक्‍क्‍यांवर कर्जमुक्ती योजनेचे काम पूर्ण झाले आहे. कामाची गती वाढविण्यासाठी या आठवड्यात कर्जमुक्ती योजनेसंबंधीची समिती बैठका घेणार असल्याची माहिती मिळाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com