नांदेड, परभणी, हिंगोलीत हलका पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीत हलका पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीत हलका पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४४ मंडळांत मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ६, तर माहूर तालुक्यात २ मंडळांत अधिक जोर राहिला. या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांत सोमवारी (ता. २९) रात्री, मंगळवारी (ता. ३०) दुपारपर्यंत रिमझिम सुरू होती. दरम्यान, अजून एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या अद्याप प्रवाहित झाले नसल्याची स्थिती आहे. 

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, धर्माबाद, नायगाव, बिलोली तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. किनवट तालुक्यातील ७ पैकी किनवट, मांडवी, बोधडी, दहेली, जलधारा, शिवणी या ६ मंडळांत आणि माहूर तालुक्यातील वानोळा, सिंदखेड या दोन मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील ३९ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत रिमझिम पावसाच्या सरी सुरू राहिल्या. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा नांदेड ९, नांदेड ग्रामीण ९, वजीराबाद १०, वसरणी ९, तरोडा १०, लिंबगाव ८, तुप्पा १०,विष्णुपुरी ८, अर्धापूर १३, दाभड १२, मुदखेड १७, मुगट १५, बारड ३५, हदगाव ३४, तामसा १६, मनाठा १५, पिंपरखेड ३३, आष्टी १८, निवघा २०, तळणी १७, माहूर ५०, वाई ५३, वानोळा ६८, सिंदखेड ७१, किनवट ७६, इस्लापूर ५१, मांडवी ९१, बोधडी ७१, दहेली ९२, जलधारा ८२, शिवणी ९०, हिमायतनगर ४५, सरसम ३२, जवळगाव २६, भोकर २५, किनी ३५, मोघाली २७, मातुल २९, उमरी २६, सिंदी १५, गोलेगाव ३०, धर्माबाद २९, जारिकोट ३७, करखेली २२, नायगाव २१, नरसी २०, मांजरम १६, बरबडा २९, कुंटूर २६, बिलोली ३२, कुंडलवाडी १९, सगरोळी २८, आदमपूर २४, लोहगाव २२, देगलूर १६, खानापूर १३, शहापूर १२, मरखेल ३५, मालेगाव ३२, हानेगाव १९, मुखेड २०, जांब १९, येवती १८, जाहूर २६, चांदोळा १७, मुक्रमाबाद २२, बाऱ्हाळी १६, कंधार १५, फुलवल ११, उस्मानननगर ९, बारुळ १५, पेठवडज ११, कुरुळा १४, माळाकोळी १७, कलंबर १५, शेवडी ६, सोनखेड ११
परभणी जिल्हा केकरजवळा ५, पाथरी ५, सोनपेठ ७, आवलगाव ६, गंगाखेड ५, राणीसावरगांव ७, माखणी ७, पालम ५, बनवस ७, पूर्णा ५, चुडावा ६.
हिंगोली जिल्हा हिंगोली १४, खंबाळा ६, माळहिवरा २४, सिरसम १८, बासंबा ११, नरसी नामदेव १४, डिग्रस २६, कळमनुरी ३३ नांदापूर ६, आखाडा बाळापूर ३९, डोंगरकडा १६, वारंगा फाटा २४, वाकोडी १७, गोरेगाव १४, आजेगाव ५, पानकनेरगाव ५, हत्ता ५, वसमत ७, हट्टा ५, औंढा नागनाथ १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com