खते मुबलक; पण किंमत जादा 

राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची टंचाई नाही. उलट दहा लाख टन खते शिल्लक आहेत. खते महाग झाल्याने काही भागांत समस्या उद्‍भवली आहे. मात्र यावर केंद्र शासनच उपाय काढू शकते, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Khate Mubalak; Pan price more
Khate Mubalak; Pan price more

पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची टंचाई नाही. उलट दहा लाख टन खते शिल्लक आहेत. खते महाग झाल्याने काही भागांत समस्या उद्‍भवली आहे. मात्र यावर केंद्र शासनच उपाय काढू शकते, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  ‘‘शेतकऱ्यांना कमाल किरकोळ दरापेक्षा (एमआरपी) जादा दराने विक्री, जोडून उत्पादने विकणे (लिंकिंग) आणि टंचाई अशा सर्व मुद्द्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या बाबत शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर किंवा तपासणीमध्ये कुठेही कायद्याचा भंग आढळल्यास कारवाई केली जाईल.  मात्र खत उत्पादक कंपन्यांनी अलीकडेच वाढवलेले अधिकृत दर शेतकऱ्यांची डोकेदुखी बनले आहेत,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण विभागाच्या सूत्रांनी दिली.  राज्यात मिश्र खतांची मागणी २-३ लाख टनांच्या आसपास असते. संयुक्त खतांना मात्र भरपूर मागणी असते. मात्र रब्बी हंगामात मागणीच्या तुलनेत पुरवठा भरपूर असून, सव्वातीन लाख टन खते शिल्लक आहेत. ६ डिसेंबर २०२१पासून खतांचे दर वाढल्यानंतर काही भागांमध्ये अडचणी येत आहेत. आम्ही केंद्र शासनाला दरवाढीचा मुद्दा कळवला आहे. दरवाढीमुळे कदाचित शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेकदेखील होऊ शकतो, असेही केंद्राला लिहिलेल्या पत्रात सूचित केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

कच्च्या मालाच्या दरात वाढ  आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाचे दर वाढले आहेत. खतांसाठी लागणारा कच्चा माल तसेच आयात होणारी तयार खते अशा दोन्ही बाबींमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे देशातील खत उद्योगात असणाऱ्या कंपन्यांनी आपपल्या उत्पादनांच्या एमआरपीमध्ये वाढ केली आहे. जागतिक बाजारात युरियाची किंमत वाढून ७४०० रुपये टनापर्यंत गेली आहे. तोच युरिया सरकारी अनुदानात शेतकऱ्यांना २६६ रुपये ५० पैसे प्रति गोणी दराने विकावा लागतो आहे.  खतांच्या किमती खत कंपन्यांनी वाढविल्या आहेत. त्या मागे घेण्याबाबत केंद्र शासन आदेश देऊ शकेल. मात्र त्यापूर्वी कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारला आपले मदत विषयक धोरण कंपन्यांसमोर मांडावे लागेल. सरकारने लक्ष न घातल्यास जादा दराची समस्या कायम राहील, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना जुन्याच दराने  खताची विक्री करा ः भुसे 

मुंबई : महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी खत विक्रेत्यांना केल्या आहेत.  भुसे यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडावीय यांना पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांत विविध रासायनिक खतांच्या किमतींमध्ये १२५ ते १९५ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित बिघडत आहे.  भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना खतांच्या किमतींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे खत पुरवठादारांनी त्यांच्याकडील जुना खत साठा त्याच दराने विक्री करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com