पीकविमा सर्वेक्षण अहवालाचा घोळ मिटला

crop insurance
crop insurance

पुणे: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या लाखो हेक्टर पिकाचे सर्वेक्षण अहवाल तयार झाले आहेत. मात्र, हे अहवाल कोणी कोणाला पाठवायचे यावरून राज्यभर उडालेला गोंधळ अखेर कृषी आयुक्तांना मिटवावा लागला. या कामासाठी वैयक्तिक ई-मेल वापर करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. पीकविमा प्रक्रिया व्यवस्थित होण्याची मुख्य जबाबदारी विमा कंपन्यांची असतानाही कंपन्यांनी टंगळमंगळ केली गेली. कंपन्यांची कामे दबाव आणून कृषी सहायकांच्या अंगावर लादल्याचेही उघड झाले.  या गोंधळातून तयार झालेले सर्वेक्षणाचे अहवाल नेमके कोणाला पाठवायचे याविषयी काही दिवसांपासून संभ्रमावस्था होती. ‘सर्वेक्षण तपशील हस्तांतरित करण्याची कार्यपध्दती अखेर तयार झाली आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी स्वतः राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी (एसएओ) अधिकाऱ्यांना ही कार्यपध्दत कळविली आहे. मात्र, काही अधिकारी काम टाळण्यासाठी पीकविम्याचा बाऊ करतात,’अशी माहिती सूत्रांनी दिली. विमा कंपनीला मसुद्यानुसार स्वाक्षरी केलेली हार्डकॉपी, शेतकरी यादीस हस्तांतरित करताना पोहोच घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ‘खासगी ई-मेल आयडीवरून याबाबत पत्रव्यवहार करण्यास देखील बंधन टाकण्यात आले आहे. एसएओ ऑफिसच्या ई-मेल आयडीवरूनच विमा कंपनीला पत्रव्यवहार करावा. त्यासाठी फक्त एसएओ व उपसंचालकांनी दक्षता घ्यावी,’ असे आयुक्तांचे म्हणणे आहे. विमा कंपन्यांना केलेल्या पत्रव्यवहाराची एक प्रिंट काढून ठेवावी, असे सांगताना आयुक्तांनी या मेलमध्ये तपशील व विषय काय लिहावे याचे देखील मार्गदर्शन आयुक्तांनी केले आहे. पंचनाम्यांचे गठ्ठे एकत्र करा ‘पीकविमा योजनेत कंपन्यांकडून कोणतीही मदत कर्मचाऱ्यांना झालेली नाही. लाखो पंचनाम्यांचे गठ्ठे देखील कोणी कोणाला द्यायचे तसेच ते जतन कोणी करायचे या संभ्रमात कर्मचारी होते. आता आयुक्तालयाने दिलेल्या सूचनेनुसार पंचनाम्यांचे गठ्ठे एसएओ ऑफिसमध्ये ठेवले जाणार आहेत,’ अशी माहिती कर्मचारी सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com