जालना जिल्ह्यातील लघुप्रकल्पांत १६ टक्‍केच उपयुक्‍त पाणी

In Jalna district, only 16% usable water is available for small-projects
In Jalna district, only 16% usable water is available for small-projects

जालना : जिल्ह्यातील ५७ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात ५७ लघुप्रकल्प आहेत. त्यातील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. या ५६ लघुप्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. १४ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. केवळ ९ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के, ८ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के व केवळ ४ लघुप्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थितीही फारशी समाधानकारक नाही. या सातही प्रकल्पांत केवळ २७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. एका प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. २ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, २ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍के; तर २ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. 

८१ लघुमध्यम प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८१ लघुमध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामध्ये १० मध्यम प्रकल्पांसह ७१ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील सहा प्रकल्पांसह औरंगाबाद जिल्ह्यातील २२, बीडमधील २५, लातूरमधील १० व उस्मानाबादमधील ८ प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. १० मध्यम प्रकल्पांत औरंगाबादमधील २, बीडमधील ४, उस्मानाबादमधील ३ व लातूरमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.  

८७३ प्रकल्पांत ५४ टक्‍के उपयुक्‍त पाणी

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ ५४. ४१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांत ६६.४० टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३६.९३ टक्‍के, ७४९ लघुप्रकल्पांत केवळ २७.७२ टक्‍के, गोदावरी नंदीवरील १३ बंधाऱ्यांत ६५.७४ टक्‍के; तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत केवळ १२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com